Loading Events

← Back to Events

Tringalwadi Fort

+ Google Map
Tringalwadi Fort
Tringalwadi, Maharashtra 422402 India

त्रिंगलवाडी (Tringalwadi)

पोहोचण्याच्या वाटा :
गडावर जाण्यासाठी ३ मार्ग आहेत.
१) त्रिंगलवाडी मार्गे:- गाडीने किंवा रेल्वेने इगतपुरी गाठावे.
रेल्वेने :- इगतपुरीच्या पूर्वेकडे म्हणजेच एसटी स्टँडच्या बाजूला बाहेर पडावे. एसटी स्थानकाच्या अलीकडे आंबेडकर चौक लागतो. या चौकातून एक वाट वर जाते. या वाटेने पुढे पंधरा मिनिटे चालत गेल्यावर उजवीकडे वळावे. अर्ध्या तासात आपण वाघोली नावाच्या खिंडीत पोहोचतो. खिंडीतून खाली उतरल्यावर आपण त्रिंगलवाडी नाक्यावर पोहोचतो. येथून डावीकडे (त्रिंगलवाडी गावाकडे) वळावे. अर्ध्या तासात आपण त्रिंगलवाडी गावात पोहोचतो. त्रिंगलवाडी गावापर्यंत इगतपुरी – त्रिंगलवाडी अशी जीपसेवा देखील उपलब्ध आहे. गावाच्या मागे त्रिंगलवाडी धरण आहे. धरणाच्या भिंतीवर चढून डावीकडे वळावे. भिंत संपल्यानंतर उजवीकडची वाट पकडावी. या वाटेने अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. पायथ्याशीच पांडवलेणी नावाची गुहा आहे.

रस्त्याने :- कसारा घाट चढून इगतपूरीच्या पुढे ९ किमीवर टाके गाव लागते. या गावातून रस्ता त्रिंगलवाडी – पत्र्याचीवाडी मार्गे तळ्याची वाडी या त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. टाके गावापासून हे अंतर अंदाजे ८ किमी आहे. तळ्याचीवाडी गावामागे तलाव आहे. तलावाच्या बाजूने वाट शेताच्या बांधावरुन किल्ल्याच्या पायथ्याच्या लेण्यांपर्यंत जाते.
या गुहेवरून गडावर जाण्यास रस्ता आहे. गड चढण्यास अर्धा तास लागतो.

http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Tringalwadi-Trek-T-Alpha.html

Ways To Reach :
Via Tringalwadi Village :
One is expected to reach Igatpuri railway station, which is well connected by rail route from Mumbai and Nasik. After exit from the station towards the S.T. stand end, there is a junction called Ambedkar Chowk before the S.T. stand. From this junction proceed along the route towards Vagholi col which is at a 30min. of walk. After moving down the col, a left turn takes us to the Tringalwadi village within half-an-hour. Hiring jeep from Igatpuri to Tringalwadi village via Ghoti is also a good alternative to reach Tringalwadi village.

Behind Tringalwadi village lies the Tringalwadi dam. After crossing the entire length of the dam wall a road on the right leads us to the foothills of this fort. We come across ‘Pandav leni’ as we approach the foothill of the fort. It takes about half-an-hour to reach the top of the fort.

http://trekshitiz.com/trekshitiz/Ei/Tringalwadi-Trek-T-Alpha.html

  • There were no results found.
%d bloggers like this: