Loading Events

← Back to Events

Asaawa Fort

Asawa Fort lies between palghar fort in the south & Aasawa in the north. The fort Remnants of structures & 3 water Tanks which are still in good condition.there are 2 caves on route one is small and another is huge one Known as Ganesh gufa. from where we can enjoy a scenic view of base village & a lake below down there .As history point of view there are no records but this might be like a watch tower to guard surroundings.
Type:- Hill
Hight :-Appx 1587 ft
Grade :- medium
base village :-Varangade

Palghar, Maharashtra 401404

asava

asawa

Trek to Asava (Asawa) fort

 

पोहोचण्याच्या वाटा :
रेल्वेने :- बोईसर हे पश्चिम रेल्वेवरील महत्वाचे स्थानक आहे. आसावा किल्ला पहाण्यासाठी बोईसर हे जवळचे स्थानक आहे. मुंबई सेंट्रलहून सुटणार्‍या काही पॅसेंजर गाड्या बोईसरला थांबतात. तसेच विरार – डहाणू या दर तासाला सुटणार्‍या गाड्या बोईसरला थांबतात. डोंबिवलीहून सकाळी ५.३३ सुटणारी डोंबिवली- डहाणू गाडी मध्य रेल्वेवरील सर्वांसाठी सोईची आहे. आसावा किल्ला बोईसर पूर्वेला आहे, पण किल्ल्यावर जाण्यासाठी बसेस ( ठाणे , कल्याण मार्गे जाणार्‍या सर्व बसेस वारंगडे गावात थांबतात) व टमटम (१० आसनी रिक्षा नवापूर फाट्यावर मिळतात) पश्चिमेला मिळतात. बोईसर पासून किल्ल्याच्या पायथ्याचे वारंगडे गाव ८ किमीवर आहे.
रस्त्याने :-मुंबई – अहमदाबाद महामार्गावर मुंबई पासून ९२ किमीवर बोईसरला जाणारा चिल्हार फाटा आहे. या फाट्यावरून बोईसरला जाताना १० किमीवर वारंगडे हे गाव आहे.

वारंगडे गावात विराज फॅक्टरी आहे. वारंगडे गावातून विराज फॅक्टरीकडे जातांना फॅक्टरीच्या अगोदर उजव्याबाजूस (बोईसरहून चिल्हार फाट्याकडे जातांना) बारीपाडा गावाकडे जाणारा रस्ता जातो. (या रस्त्याच्या सुरुवातीला एक मोबाईलचा टॉवर आहे). या फॅक्टरीच्या कंम्पॉऊंडला लागून जाणारा रस्ता ८५० मीटरवरील किल्ल्याच्या पायथ्याच्या बारीपाडा गावात जातो. गाव सुरू होण्यापूर्वीच आंगणवाडीची बैठी इमारत डाव्या बाजूला दिसते. या इमारतीच्या बरोबर समोर (म्हणजेच वारंगडे – बारीपाडा रस्त्याच्या उजव्याबाजूस) एक कच्चा रस्ता किल्ल्याकडे जातो. पावसाळ्यात एक छोटा ओहळ ओलांडून जावे लागते. या कच्च्या रस्त्याने ५ मिनिटे चालल्यावर डोंगर व रस्ता यांच्या मधून आडवा जाणारा नाला लागतो. या नाल्यावर ३ पूल आहेत. येथून गडावर जाण्यासाठी ३ वाटा आहेत.

१) पहिला पूल पार करून सरळ चालत गेल्यास आपण आसावा किल्ला व त्याला लागून असलेला डोंगर या मधील खिंडीतून गडावर जातो. पुढे ही वाट मुख्य वाटेला मिळते. हि वाट खड्या चढणीची असून दाट जंगलातून जाते. वाट फारशी वापरात नसल्याने वाटाड्या घेऊनच या वाटेने जावे. या वाटेने साधारणत: पाऊण तासात किल्ल्यावर पोहोचता येते.

२) पहिला पूल पार करून डाव्या बाजूस चालत गेल्यास आपण आसावा किल्ल्याच्या डोंगरजवळ पोहोचतो. हि वाट खड्या चढणीची असून दाट जंगलातून जाते व किल्ल्याखाली असलेल्या गुहे जवळून गडावर जाते. ही वाट फारशी वापरात नसल्याने वाटाड्या घेऊनच या वाटेने जावे. पावसाळ्यात ही वाट टाळावी. या वाटेने साधारणत: पाऊण तासात किल्ल्यावर पोहोचता येते.

३) पहिल्या पूलापाशी आल्यावर तो पूल न ओलांडता उजव्या बाजूचा कच्चा रस्ता पकडावा. थोड्या अंतरावर दुसरा पूल लागतो. त्यापुढे तिसरा पूल आहे. हा तिसरा पूल पार केल्यावर समोरच्या टेकडीवर जाणारी पायवाट दिसते. हि किल्ल्यावर जाणारी राजवाट आहे. किल्ल्याच्या बाजूला असलेल्या डोंगराला वळसा घालून ही वाट हळूहळू चढत किल्ल्याच्या डोंगरावर जाते. हि वाट दाट झाडीतून जात असल्याने थकवा जाणवत नाही.किल्ल्याच्या डोंगरावर आल्यावर मात्र वाट खड्या चढणीची आहे. या वाटेने साधारण १ ते १.५ तासात आपण किल्ल्यावर पोहोचतो. हि वाट मळलेली व रूंद असल्यामुळे या वाटेने गडावर जाण्यासाठी वाटाड्याची आवश्यकता नाही.

http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Asawa-Trek-Palghar-Range.html

Asaawa Fort
  • There were no results found.
%d bloggers like this: