Anjaneri Fort

Loading Events

← Back to Events

Anjaneri Fort

+ Google Map
Anjaneri Fort Maharashtra 422213 India

अंजनेरी फोर्ट

Ways To Reach :
The primary way to reach the Anjaneri fort is from Anjaneri village. One should get down at Anjaneri Phata, which is 20 km away from Nasik on the Nasik-Tryambakeshwar road. Anjaneri village is at a walking distance of 10 to 15 minutes from Anjaneri Phata. Two pinnacles called ‘Navara’ and ‘Navari’ can be seen from Anjaneri village. The way to fort goes through Anjaneri village itself. Next to that there are some steps, through which we reach the plateau of Anjaneri. It takes almost one and the half hour to reach this plateau from Anjaneri village.

http://trekshitiz.com/Ei/Anjaneri-Trek-A-Alpha.html

पोहोचण्याच्या वाटा :
१२ ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. अंजनेरी किल्ला त्र्यंबकेश्वर पासून ३ किलोमीटर अंतरावर आहे. अंजनेरी किल्ल्यावर नाशिक – त्र्यंबकेश्वर एसटी बसने आल्यास जाण्यासाठी नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि मी अंतरावरील अंजनेरी फाट्यायावर उतरावे. या फाट्यापासून १५ मिनिटे चालत गेल्यावर आपण अंजनेरी गावातील हनूमान मंदिरापाशी पोहोचता येते. अंजनेरी गावातून किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता बनवलेला आहे. सध्या (इ.स.२०१७) जीप सारखे वाहान या रस्त्याने जाऊ शकते. . हनुमान मंदिरापासून किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी दोन पर्याय आहेत. कच्च्या रस्त्याने जाणे किंवा पायवाटेने जाणे. कच्चा रस्ता फ़िरत फ़िरत पायथ्याशी जातो, तर पायवाट हळूहळू चढत रस्त्याला मिळून पायथ्याशी जाते. पावसाळ्यात पायवाटेवर छोटे ओढे लागतात. हनुमान मंदिरा पासून थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूस एक ठळक पाऊलवाट दिसते. या पायवाटेने साधारण २५ ते ३० मिनिटात आपण कच्च्या रस्त्याला लागतो. या रस्त्याने १० मिनिटे चालल्यावर आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागाच्या चौकी पाशी पोहोचतो. चौकी पासून पायर्‍यांची वाट सुरु होते. पायर्‍यांच्या साह्याने अंजनेरीच्या पठारावर आणि तेथून पुढे बालेकिल्ल्यावर पोहोचता येते. अंजनेरी गावातून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी  तास लागतात.

http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Anjaneri-Trek-A-Alpha.html

अंजनेरी किल्ला जनमानसात परिचित आहे तो हनुमान-जन्मस्थानामुळे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला, असे मानले जाते. म्हणूनच या किल्ल्याला ‘अंजनेरी’ नाव देण्यात आले. याच डोंगराच्या परिसरात हनुमान लहानाचे मोठे झाले असे समजले जाते. येथे १०८ जैन लेणी आहेत. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80

अंजनेरी किल्ला इतिहासात परिचित आहे तो हनुमान जन्मस्थानामुळे. वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाला म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी म्हणजेच अंजनी पुत्राचे नाव देण्यात आले आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रांगेतील अंजनेरी हा देखील एक महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे.
किल्ल्याची उंची : ४२०० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग : त्र्यंबकेश्वर
जिल्हा : नाशिक
श्रेणी : सोपी
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताना वाटेतच पायऱ्यांच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात. ही लेणी जैनधर्मीय असल्याचे दिसून येते. पठारावर पोहोचल्यावर १० मिनिटांतच अंजनी मातेचे मंदिर लागते. मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे. मुक्काम करण्यासाठी योग्य आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक डावीकडे वळते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. डावीकडच्या वाटेने वळल्यावर १० मिनिटांतच आपण सीता गुहेपाशी येऊन पोहोचतो. गुहा दोन खोल्यांची आहे. यात १० ते १२ जणांना राहता येते. गुहेच्या भिंतीवर अनेक शिल्पे कोरलेली आहे. समोर असणाऱ्या वाटेने बालेकिल्ल्यावर गेल्यावर २० मिनिटांत आपण दुसऱ्या अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. हे मंदिर सुद्धा प्रशस्त आहे. किल्ल्याचा घेरा फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावर बाकी काही पाहण्यासारखे नाही.
गडावर जाण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठीची मुख्य वाट अंजनेरी गावातून वर जाते. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि.मी. अंतरावरील फाट्यावर उतरावे. या फाट्यापासून १० मिनिटे अंतरावरील अंजनेरी गावात पोहोचावे. गावातून नवरा-नवरीचे दोन सुळके नजरेस भरतात. गावातूनच एक प्रशस्त वाट किल्ल्यावर जाते. पुढे पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या साह्याने अंजनेरीच्या पठारावर पोहोचता येते. अंजनेरी गावापासून येथपर्यंत येण्यासाठी दीड तास पुरतो.
राहण्याची सोय :
१. पठारावरील अंजनीमातेच्या मंदिरात १० ते १२ जणांची सोय होते. २. सीता गुंफेत सुद्धा १० ते १२ जणांची सोय होते.
जेवणाची सोय :
आपण करावी.
पाण्याची सोय :
मंदिराजवळच बारामाही पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
अंजनेरी गावातून २ तास.

Anjaneri Fort
Anjaneri Fort
Anjaneri Fort
Anjaneri Fort
  • There were no results found.
Scroll to top
Do NOT follow this link or you will be banned from the site!