Ultra MountainTrail Run – ISOLATION ZONE Trekking Group

Welcome to Mumbai Hikers Forums General Ultra MountainTrail Run – ISOLATION ZONE Trekking Group

Viewing 1 post (of 1 total)
 • Author
  Posts
 • #9109

  तुमच्या शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा गिर्यारोहनामधील एक साहसी क्रीडा प्रकार !

  मी हा क्रीडा प्रकार मागील अडीच वर्षांपासून “ISOLATION ZONE” Trekking ग्रूप बरोबर करत आहे. ह्या क्रीडा प्रकाराबद्दलचा माझा अनुभव इथे मांडत आहे.

  १ जानेवारी २०१६ नवीन वर्षाचा पहिला दिवस नवी उमेद घेऊन मी अलंग-मदन-कुलंग हा सह्याद्रीतील अवघड असा ट्रेक “Explorer Pune” ह्या ग्रूप बरोबर करत होतो. पहिल्या दिवशी अलंग गड सर केल्या नंतर सायंकाळी आम्ही सर्व ग्रूप अलंग ची पाहणी करण्यासाठी गडावर फिरत होतो.

  गड फिरत असताना गडावरील सर्व माहिती ट्रेक लिडर श्री. सुनिल शेलार देत होते तसेच गडाच्या आजूबाजूच्या प्रसिध्द ठीकानांची माहिती देत असताना त्यांनी गडाच्या दक्षिणेकडील रतनगड आणि सांधन दरी दाखवली. सांधन दरी दाखवताना त्यांनी तेथे चालू असलेल्या Gaint Swing या साहसी क्रिडा प्रकाराची माहिती दिली. हा साहसी क्रिडा प्रकार कोणत्या आणि कशा प्रकारे केला जातो हे ऐकून अंगावर काटा आला आणि मी ठरवले हा साहसी क्रिडा प्रकार आपण या वर्षी करायचाच!

  गड फिरुन झाल्यानंतर मी या साहसी क्रिडा बद्दल श्री. सुनिल सर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आणि मला कळले की श्री.अरुण सावंत सर आणि त्यांचा ISOLATION ZONE ट्रेकिंग ग्रुप हा थरारक क्रिडा प्रकार दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आयोजित करतात. त्याप्रमाणे मी ११ डिसेंबर,२०१६ रोजी Gaint Swing हा थरारक क्रिडा प्रकार साक्षात अनुभवला. हा माझ्या आयुष्यामधील पहिला gaint swing होता.

  या निमित्ताने माझी श्री अरुण सावंत सर आणि ISOLATION ZONE group यांच्याबरोबर ओळख झाली. त्याच महिन्यात अरुण सरांची फ़ेसबुक वरची “अलंग – मदन – कुलंग trek in one day” ही पोस्ट फ़ेसबुक वर वाचली. क्षणभर मनामधे विचार आला कि हे कसे शक्य आहे , जो ट्रेक आपण तीन दिवसांमध्ये केला तो एका दिवसात करायचा. अशक्य ???????

  थोडा विचार केला आणि ठरवले कि आपण हया ट्रेकमध्ये सहभाग घ्यायचा. आणि लागलीच ISOLATION ZONE चे पुण्यातील ग्रूप लिडर श्री सागर अमराळे आणि श्री संजय शेळके यांना माझे नाव सहभागी यादीमध्ये नोंद करायला लावले. जानेवारी २०१७ मध्ये मी हा अशक्य वाटणारा ट्रेक आम्ही १३ तास ३० मिनिटात पूर्ण केला. याचे संपूर्ण श्रेय हे अरुण सर आणि संपूर्ण टीम ला जाते. अचूक नियोजन, जबरदस्त उत्साह , टीम लीडर्स मधला ताळमेळ, आणि वापरलेली सेफ्टी साधने, सर्व काही एकदम तंतोतंत आणि ठरल्याप्रमाणे झाले. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजलो कि आपल्याला एवढ्या छान टीम बरोबर हा अशक्य असा ट्रेक एका दिवसात पूर्ण करता आला.

  त्याच वर्षी साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये फ़ेसबुक वर अरुण सरांची लोणावळा ते भीमाशंकर या माउंटेन ट्रेल रन ची पोस्ट पाहिली. साधारण माउंटेन ट्रेल रन हा प्रकार पश्चिमात्य देशांमध्ये केला जातो असे ऐकले होते आणि अरुण सर तोच प्रकार आपल्या सह्याद्री मध्ये करत आहेत हे पाहून माझी उत्सुकता आणखी वाढली आणि मी ठरवले की मी या मोहिमेत सहभाग घेणारच ! आणि लागलीच सरांनी सांगितल्या प्रमाणे दररोज ५ किमी धावण्याचा सराव चालू केला. आणि त्यामुळेच मी हा अवघड असा वाटणारा ६० किलोमीटर अंतराचा माउंटेन ट्रेल रन एका दिवसात १५ तास ५० मिनिटात पूर्ण केला.

  मग काय त्यानंतर
  ना-भी (नाणेघाट ते भीमाशंकर ते खान्डस 57km), सिंहगड राजगड तोरणा(50km),
  कात्रज घाट ते रायगड (81.6km)
  असे माउंटेन ट्रेल रन सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले . आता तर ही खरी सुरुवात झाली आहे. पुढे सह्याद्री मध्ये अजून खूप माउंटेन ट्रेल रन करायचे आहेत आणि सगळा सह्याद्रीच पिंजून काढायचा आहे. चला तर मग कोण कोण इच्छुक आहे आमच्या सोबत पुढील माउंटेन ट्रेल रन ला येण्यासाठी 🙂

  तुमच्या माहितीसाठी नाणेघाट ते भीमाशंकर माउंटेन ट्रेल रनचा विडिओ You Tube var ahe —-◆ https://youtu.be/uiD6l0DPdxM

  जर तुम्ही इच्छुक असाल तर खालील दिलेल्या नंबर्स वर संपर्क करू शकता.

  श्री.अरुण सावंत सर 9869474343
  श्री.सुरज मालुसरे : 9221831364
  श्री.संजय शेळके : 98908 59770
  श्री.सागर अमराळे : 9881123400
  श्री.रोहन मालुसरे : 7208325078 श्री.गणेश भिंताडे : 9960706644

  — google translate —
  “Ultra MountainTrail Run” is
  an adventure sporting adventure that enhances your physical ability!

  I’m doing this type of sport with the “ISOLATION ZONE” Trekking Group for the last two and a half years. Here is my experience of this type of sport.

  January 5, New Year’s Day With the new hope, I was doing a difficult trek from Alang-Madan-Kulang to Sahyadri with the group “Explorer Pune”. After the first day of Alanggad, we were walking around the fort to inspect all the groups.

  While traveling the fort, all the information on the fort is called Trek Leader Mr. Sunil Shelar was giving information as well as giving information about the famous places around the fort, he showed Ratanagad and Jandan valley south of the fort. While showing the bridges, he gave information about the sports complex of Gaint Swing, which is running there. Hearing about what and how this adventure sports is done, I got the hang of it, and I decided that this is the adventure sport we want to do this year!

  After the fort was over, I am about this adventure game Mr. He took detailed information from Sunil Sir and I realized that Mr. Arun Sawant Sir and his ISOLATION ZONE Trekking Group are organizing thrilling sports types every year in December. Accordingly, on December 11, 2016, Gaint Swing experienced the thrilling game type. This was the first gaint swing in my life.

  On this occasion I was introduced to Mr. Arun Sawant Sir and the ISOLATION ZONE group. In the same month, Arun Sarani’s Facebook post “Alang – Madan – Kulung trek in one day” was read on Facebook. For a moment in Manama, the thought was how is this possible? Impossible

  Have thought a little and decided that you would like to participate in this track. And immediately after starting the ISOLATION ZONE, Pune group leader Lata Sagar Amale and Mr. Sanjay Shelke were asked to register my name in the list. In January 2017, I completed this 13-hour 30-minute trek. The whole credit goes to Arun Sir and the whole team. Accurate planning, tremendous enthusiasm, coordination among team leaders, and the safety instruments used, everything has become absolutely accurate and fixed. And I found myself very fortunate that we could complete this impossible trek in one day with such a great team.

  In November of that same year, I saw the post of Arun Sarchi Lonavala to Bhimashankar Mountain Trail Run on Facebook. I had heard that the ordinary Mountain Trail Run is done in Western countries and my curiosity got even more excited that Arun Sir was doing the same thing in his Sahyadri and I decided that I would join the campaign! And immediately started the practice of running 5km every morning as stated by the head. And that’s why I completed the 5km mountain trail run in what seemed like a difficult time, in an hour and a minute.

  After that, the mountain trail runs from
  Na-bhi (Naneghat to Bhimashankar to Khandas 57km), Sinhagad Rajgad Toran (50 km),
  Katraj Ghat to Raigad (81.6km)
  were completed under the guidance of Sar . Now this is the real beginning. There are still many more mountain trails to run in Sahyadri and all the Sahyadri have to tread. If so let’s go to the next Mountain Trail with us who wants to 🙂

  You can find videos from Nineghat to Bhimashankar Mountain Trail Run for your information. You Tube var ahe —- ◆ https://youtu.be/uiD6l0DPdxM

  If you want, you can contact the numbers given below.

  Shri. Arun Sawant Sir 9869474343 Shri. Suraj Malusare: 9221831364 Shri.
  Sanjay Shelke: 98908
  59770
  Shri. Sagar Amalay: 9881123400 Shri. Rohan Malusare: 7208325078 Shri Ganesh Bhintade: 9960706644

  "Ultra MountainTrail Run" तुमच्या शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा गिर्यारोहनामधील एक साहसी क्रीडा प्रकार !मी हा क्रीडा…

  Posted by Ganesh Bhintade on Friday, July 19, 2019

Viewing 1 post (of 1 total)
 • You must be logged in to reply to this topic.