Home Forums General Thoughts on mahuli fort closure (marathi)

This topic contains 0 replies, has 1 voice, and was last updated by Thoughts on mahuli fort closure (marathi) 1 mumbaihikersadmin 1 month, 1 week ago.

Viewing 1 post (of 1 total)
 • Author
  Posts
 • #8720

  #कृपया_वाचा_आणि_विसरून_जा…

  आजपासून कोणतीही पुर्वसूचना न देता, अचानक #माहुली किल्ला सर्वांसाठी #पूर्णपणे_बंद करण्यात आला आहे. विरस टाळण्यासाठी कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.

  आज जवळजवळ ४०० पेक्षाही जास्त जणांना वनखात्याच्या टोल चौकीपासून परत पाठवण्यात आले. कारण विचारता, “तुम्ही बंदी हुकूम मोडून जात आहात असे लिहून द्या… मग तुम्हांला सोडतो” असे तेथील अधिकारी, कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात आले… या विधानामागे सुचनेऐवजी धमकीचाच सुर जास्त दिसून येत होता.

  गेल्या वर्षीसुद्धा अशीच बंदी पुकारण्यात आली होती. परंतु ती फक्त गडपायथ्याच्या अत्यंत धोकादायक अशा धबधब्यापुरतीच मर्यादित होती. त्यामुळे ती अगदी १००% योग्य होती. याकरीता संबंधीत यंत्रणेचे खरोखर अभिनंदन केले पाहिजे. पण यंदाच्या वर्षी धबधब्यासह गडावर जाणाऱ्या #भटक्या, #दुर्गप्रेमी_ट्रेकर्ससहीत सर्वांवर सरसकट बंदी लादून नक्की काय साधले गेले? याचा कोणी सविस्तर खुलासा केल्यास मनःपूर्वक स्वागत आहे

  सद्या सर्वच धबधब्यांवर नियंत्रणापलिकडे दिसणारी, बेक्कार चाळ्यांनी, भिक्कार दारुकामाने स्वतःसह इतरांच्याही जीवाशी खेळणारी #गर्दी निश्चितच अनावश्यक आणि प्रचंड अनाठायी असते. धोकादायक असते, हे सर्वथा मान्य. परंतु असे उपद्रवी व दुर्गांना मौजमजेचा अड्डा समजणारे हरामखोर… यांच्यात आणि गडकिल्ल्यांवर, #गडसफाई, #गडसेवा, #दुर्गसंवर्धन अशा विधायक कार्यांद्वारे त्यांना सन्मानजनक पद्धतीने वहिवाटेत ठेवणारी… दुर्लक्षित दुर्गविश्वास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपल्या परीने वैयक्तिक व संघटित अशा दोन्ही स्तरावर धडपडणारी… गडकोटांवर जीवापाड प्रेम करणारी… #भटकी… #दुर्गप्रेमी… #ट्रेकर मंडळीं… यांतला साधा-सरळ फरकही संबंधीत यंत्रणांना यथोचित पद्धतीने समजाऊन सांगणारी #मध्यस्थ किंवा #शिखर_संघटना महाराष्ट्रासारख्या, सर्वच क्षेत्रात, नित्य नवे मानदंड उभारणाऱ्या अग्रेसर राज्यांत अस्तित्वात नसावी याचे आज प्रचंड वैषम्य वाटले.

  महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे, पराक्रमी वारशाचे साक्षीदार असलेल्या आणि अापल्या स्वार्थी धोरणांचे बळी ठरत चाललेल्या गडकोटांची अवस्था आधीच #चिंताजनक आहे. त्यावर शासन… हजारोंच्या संख्येने असलेल्या #गिर्यारोहण संस्था… आणि संबंधित यंत्रणांच्या प्रभावी समन्वयातून काही उपयुक्त उपाययोजना राबविण्याऐवजी अशा उपद्रवी दिशाहीन निर्णयांमुळे खरंच काही उपयोग होतो का? याबाबत संबंधीत विभागाचे #मंत्रीमहोदय, धोरणी #अधिकारी वर्ग आणि अशासकीय जाणकार तज्ञ #NGO यांच्याकडून व्यापक स्तरावरील चळवळींची, अधिक मार्गदर्शनाची नितांत गरज आहे असे मला व्यक्तीशः वाटते.

  मागील २५ हून अधिक वर्षे साहसी #भटकंती आणि गिर्यारोहण क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहूनही अशा कठोर बंदी आदेशांमागचे कोडे मला सुटू नये याचा अर्थ इतकाच की हे गौडबंगाल समजण्याइतका मी नक्कीच पात्र नाही… या तुटपुंज्या लिखाणाद्वारे कुणाला दुखावण्याचाही माझा हेतू नाही… परंतु देशाच्या घटनेने दिलेला भ्रमण करण्याचा अधिकार आणि आमच्यासारख्या भटक्या दुर्गप्रेमींचे विधायक कार्य यांचा संकोच करणाऱ्या… शेंडाबुडखा नसलेल्या… त्रासदायक आदेशांद्वारे विघ्न का आणले जाते? यावर खरंच कोणी प्रकाश टाकू शकेल का?

  -Anand Shinde

Viewing 1 post (of 1 total)

You must be logged in to reply to this topic.