Nandu Chavan donates to Nisarga Mitra Rescue Team

Home Forums General Nandu Chavan donates to Nisarga Mitra Rescue Team

This topic contains 0 replies, has 1 voice, and was last updated by  mumbaihikersadmin 3 months, 3 weeks ago.

Viewing 1 post (of 1 total)
 • Author
  Posts
 • #6491

  For this purpose, one person was constantly helping the people. Which never came forward. Rescue equipment (walkie-talkie, stretcher, hardware) was provided to the rescue team.

  पडद्यामागील सूत्रधार

  सहयाद्री परिसरात विविध किल्ले, घाटवाटा,सुळके,नद्या,तलाव,घळी, जंगल,रानवाटा,यांची रेलचेल आहे. पूर्वी काही ठराविक मंडळी यांचा आस्वाद घ्यायला डोंगर जवळ करायचे. कालपरत्वे भटकंती चे प्रमाण खूप वाढले.झुंबडीच्या झुंबडी डोंगराकडे धावू लागल्या आणि सुरू झाले अपघातांचे पर्व.

  अपुरी माहिती,गिर्यारोहणाच्या बेसिक ज्ञानाचा अभाव, मद्यधुंद अवस्था, ग्रुपची मोठी संख्या, अपुरी साधने यामुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढते राहिले. या अशा अडकलेल्या, चुकलेल्या, किंवा मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना वाचवण्याचे किंवा त्या परिस्थितीतुन बाहेर काढण्यासाठी काही संस्था स्वतःहून काम करू लागल्या.

  कुठल्याही प्रकारच्या शासकीय मदतीशिवाय आणि कुठलाही मोबदला न घेता या संस्था स्वतः पदरमोड करून हे कार्य करत आल्या. त्यांच्या या कार्याला समाजातील विविध माध्यमातून प्रसिद्धी मिळाली. सत्कार झाले.पुरस्कार मिळाले. मान्यवरांकडून शाबासकी मिळाली.

  या कामासाठी एक व्यक्ती पडद्याआड राहून सतत मदत करत आली. जी कधीच पुढे आली नाही. रेस्क्यू साठी लागणारी साधने(वॉकीटॉकी,स्ट्रेचर, हार्डवेअर) या रेस्क्यू टीम ला विनामोबदला पुरवत आली.

  ही व्यक्ती आहे श्री नंदू चव्हाण Nandu Chavan

  मनमिळाऊ, सहनशील आणि सगळ्याच गिर्यारोहकांचा हा उत्तम मित्र. काबाडकष्ट करून आपल्या आवडत्या क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू केला Mountain Sports Academy

  जॉय ऑफ हॅप्पीनेस.च्या माध्यमातून आदिवासी जनते पर्यंत याने मदतीचा हात पोहचवला.

  अशा ह्या आमच्या मित्राने निसर्गमित्र च्या रेस्क्यू टीम ला
  Spine Board Stretcher नेहमीप्रमाणे मोफत उपलब्ध करून दिले आहे.

  नंदू निसर्गमित्र संस्था आपली नेहमीच आभारी राहील.

  आजपर्यंत आपण केलेल्या मदतीमूळे अनेक जणांचे प्राण वाचवण्यात आम्हाला यश आले आहे.रेस्क्यू टीम च्या स्वतःच्या सुरक्षेसाठी सुद्धा या साधनांचा उपयोग झाला आहे.

  पडद्यामागील या हिरोला निसर्गमित्र चा सलाम

  – निसर्गमित्र रेस्क्यू टीम

  पडद्यामागील सूत्रधारसहयाद्री परिसरात विविध किल्ले, घाटवाटा,सुळके,नद्या,तलाव,घळी, जंगल,रानवाटा,यांची रेलचेल आहे. पूर्वी…

  Posted by Nisargamitra Panvel on Wednesday, June 19, 2019

Viewing 1 post (of 1 total)

You must be logged in to reply to this topic.