MAC pune meeting 24th july 2019

Home Forums General Maha Adventure Council MAC MAC pune meeting 24th july 2019

This topic contains 1 reply, has 1 voice, and was last updated by MAC pune meeting 24th july 2019 1 mumbaihikersadmin 1 month, 3 weeks ago.

Viewing 2 posts - 1 through 2 (of 2 total)
 • Author
  Posts
 • #9679

  यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…

  Maha Adventure Council – ओळख व चर्चासत्र कार्यक्रम : दि 24 जुलै 2019

  २८ जून रोजी MACची पहिली ऑफिशियल मिटींग मुंबईत झाली, तर ४ जुलै रोजी प्रसारमाध्यमातून MAC स्थापन झाल्याची जाहीर घोषणा करण्यात आली. काल MACची उद्दिष्टे आणि भावी योजना यांची रूपरेषा, ‘रंगदर्शन’, हिराबाग येथे जाहीर कार्यक्रमात मांडण्यात आली. गेला महिनाभर विविध विषयांवर चर्चा, तयाऱ्या यांची धामधूम सुरु होती. आत्ताच्या साऱ्याच सदस्यांनी आपला बहुमूल्य वेळ खर्च करून हिरीरीने यात भाग घेतला. नाही म्हटलं तरी काल शीण आला होता, म्हणून हुश्श केलं! पण आत जाणवत होतं, आत्ता तर कुठे सुरुवात आहे…
  गेल्या वर्षी जुलै महिन्यात सरकारने ‘साहसी क्रीडाप्रकार या विषयातील सुरक्षा नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे’ या संदर्भात दुसरा शासकीय निर्णय (GR) जाहीर केला. असाच पहिला शासकीय निर्णय (GR) जुलै २०१४ मध्ये आणण्यात आला होता. या क्षेत्रातील अनुभवी, तज्ञ व्यक्तींनी पुढाकार घेऊन या निर्णयातील त्रुटी व अव्यवहार्यता निदर्शनास आणून दिल्यामुळे, सप्टेंबर २०१४ मध्ये न्यायालयाने या निर्णयास स्थगिती दिली. दुर्दैवाने दुसरा शासकीय निर्णय देखील अपुरा आणि अव्यवहार्य आहे. म्हणूनच या क्षेत्रातील अनुभवी, तज्ञ व्यक्तींनी पुनश्च हालचालींना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरुवात केली. एकीकडे या नवीन निर्णयाला Writ Petition द्वारे स्थगिती मिळवणे आणि सुधारित ‘साहसी क्रीडाप्रकार या विषयातील सुरक्षा नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे’ तयार करणे असे प्रयत्न सुरु झाले.
  गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात विविध साहसी क्रीडाप्रकारातील अनेक उपक्रमात अपघात घडून आले आहेत. विविध उपक्रमांच्या निमित्ताने हजारो लोक लोकप्रिय ठिकाणी गर्दी करतांना दिसतात. स्थानिक पर्यावरण आणि लोक यांच्यावर विविध प्रकारे अनिष्ट परिणाम होत आहेत. सर्व साहसी क्रीडाप्रकारात सुरक्षितता आणि निकोप संस्कृती असावी अशी MACची भूमिका आहे. या संदर्भात MACचा शासनाला विरोध नसून, अव्यवहार्य शासकीय निर्णयाला विरोध आहे. साहसी क्रीडा प्रकारात सहभागी असणाऱ्या सर्वांना, व्यक्ती आणि संस्थांना एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. तशा अर्थानं MAC ही केवळ संस्था नसून एक चळवळ आहे. साहजिकच या चळवळीत अधिकाधिक लोकसहभाग असणं गरजेचं आहे.
  कालच पुण्यात MACची उद्दिष्टे आणि भावी योजना यांची रूपरेषा मांडण्यासाठी पहिला कार्यक्रम झाला. सुमारे सव्वाशे लोकांची उत्साहवर्धक उपस्थिती होती. यात विविध संस्थांचे प्रतिनिधी, साहसी क्रीडा प्रकारात भाग घेणाऱ्या व्यक्ती हजर होत्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभय घाणेकर यांनी केलं. MAC संदर्भातील सविस्तर सादरीकरण मी केलं. या क्षेत्रातील जुने जाणते निसर्गप्रेमी लेखक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी आपले विचार मांडले. त्यासोबत सादर शासकीय निर्णयातील त्रुटी त्यांनी अधोरेखित केल्या. काही अपरिहार्य कारणांमुळे दुसरे जुने जाणते दुर्गप्रेमी, गिरीप्रेमी लेखक आनंद पाळंदे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे मौलिक विचार ऐकण्याच्या संधीला सारेच मुकले. निवृत्त कॅप्टन अवि मलिक यांनी हवेतील क्रीडा प्रकार आणि MACचा संदर्भ याविषयी मार्गदर्शन केले. MACचे शंतनू पंडित हेही मान्यवर म्हणून उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तरे झाली आणि त्यात काही महत्वाच्या शंकांचं निरसन करण्यात आलं. याच कार्यक्रमात अनेकजण MACचे सदस्य झाले. या कार्यक्रमाला MTDC चे प्रतिनिधी अमोल भारती आवर्जून उपस्थित होते आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.

  एकीकडे निसर्गात जाऊन निखळ आनंद मिळवणे या संस्कृतीला अनिष्ट प्रथांची कीड लागत असलेली दिसते. नैसर्गिक आणि सामाजिक पर्यावरणावर घोर अत्याचार होत आहेत. सुरक्षिततेसंदर्भात होत असलेले सुजाण प्रयत्न विविध कोपऱ्यात विखुरलेले आढळून येतात. परंतु सामान्यतः एक उदासीनता आढळून येते. कालचा कार्यक्रम मात्र एक नवीन उर्जा देणारा आशादायक अनुभव होता. अधिकाधिक संस्था आणि व्यक्ती MACचे सदस्य होऊन MACच्या कार्यात भक्कम योगदान देतील असा विश्वास वाटतो. शंकांचे निरसन करून पूर्वग्रह न बाळगता या चळवळीत सहभागी होणे आत्यंतिक गरजेचे आहे! १३ ऑगस्ट रोजी सावरकर स्मारकाच्या संयुक्त विद्यमाने असाच कार्यक्रम दादर येथे मुंबईत होणार आहे.

  मित्रहो, हे सारंच खूप मोठं आव्हान आहे. अनेक कामं आहेत, सर्व साहसप्रेमींचा सक्रीय सहभाग गरजेचा आहे. साहसी क्रीडा प्रकारांवर जाचक शासकीय प्रतिबंध येण्याऐवजी शासनाच्या सहभागाने सुरक्षित, निकोप आणि पर्यावरणाला धक्का न लावणाऱ्या साहसी संस्कृतीकडे वाटचाल करता येणार आहे. आणि म्हणूनच सारी मरगळ झटकून म्हणावसं वाटतं, ‘यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…’

  MAC ची ऑनलाइन सदस्यनोंदणी जोरदार सुरू झालेली असून त्यासाठी http://www.mahaadventurecouncil.org ह्या वेबसाईटला भेट द्यावी.
  – छायाचित्रे – विकास कडुस्कर

  यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…Maha Adventure Council – ओळख व चर्चासत्र कार्यक्रम : दि 24 जुलै 2019२८ जून…

  Posted by Maha Adventure Council on Thursday, July 25, 2019

  #10078

  Yesterday was the first program in Pune to outline the objectives and future plans of the MAC
  A similar event will be held in Mumbai at Dadar on August 3, in conjunction with the Savarkar monument.
  यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…

Viewing 2 posts - 1 through 2 (of 2 total)

You must be logged in to reply to this topic.