MAC mumbai meetups 13th August 2019

Home Forums General Maha Adventure Council MAC MAC mumbai meetups 13th August 2019

This topic contains 0 replies, has 1 voice, and was last updated by MAC mumbai meetups 13th August 2019 1 mumbaihikersadmin 1 month ago.

Viewing 1 post (of 1 total)
 • Author
  Posts
 • #11222

  “MAHA ADVENTURE COUNCIL” – साहसासाठी एकत्र येण्याचा अनोखा मार्ग
  वीर सावरकर स्मारक सभागृह – राष्ट्र गीत “वंदे मातरम” ने सुरवात – “जण गण मन” ह्याने सांगता,
  राष्ट्रा बद्दल असलेला आदर, ह्यातूनच “मॅक” च्या पुढच्या कार्याची कल्पना येते,

  मुंबई मध्यल्या पहिल्या ओपन मीटिंग ला आम्हाला बोलावल्या बद्दल – आपले शतशः आभार,

  २५० ते ३०० च्या संख्येने उपस्थित असलेले साहसी खेळातळे प्रेक्षक – दिग्गजांची असलेले उपस्थिती, साहसी लोक कार्य बद्दल असलेले एकमत – बरच काही शिकवून गेले,
  श्री. साळगावकर सर,
  श्री. लिमये,
  कुं. सरस्वती मॅडम,
  श्री. वसंत लिमये,
  श्री. शंतनू पंडित,
  श्री. अभय घाणेकर,
  यांनी सहज आणि सोप्या शब्दात केलेले योग्य मार्गदर्शन आणि उपस्थितांच्या प्रश्नांना दिलेले समाधान कारक उत्तर,

  परागलीडिंग चे महाराष्ट्रातील One of The Pioneer श्री. Samson Dsilva सर,
  कुं. Sushma Mishra – “Rural Sustainable Tourism” च्या महाराष्ट्रातील पायोनियर,
  श्री. Mangesh Koyande – Village Tourism डेव्हलप करण्यासाठी – स्वखर्चाने गावातील मुलांना कोर्से ला पाठवणारे व मोलाचे कार्य करणारे,
  – श्री. बिभास आमोणकर – श्री. उदय कोलवणकर – श्री. महेश केंदूरकर, यांच्या बऱ्याच प्रश्नाने आमचीही जण जागृती झाली,
  “मॅक” च्या पुढील वाटचालीसाठी आमच्या आभाळा एवढ्या शुभेच्छा,,,,,,,,,,,,

  "MAHA ADVENTURE COUNCIL" – साहसासाठी एकत्र येण्याचा अनोखा मार्गवीर सावरकर स्मारक सभागृह – राष्ट्र गीत "वंदे मातरम" ने…

  Posted by Nandu Chavan on Thursday, August 15, 2019

  परवा १३ ऑगस्टला मुंबईत सावरकर स्मारक, शिवाजी पार्क इथे MAC म्हणजे Maharashtra Adventure Council ची मुंबईमधील पहिली सभा झाली. वास्तविक गिरीमित्र संमेलनातच मॅकची पहिली ओळख झाली होती आणि याचे सभासदत्व देखील घेतले होते. मात्र या सभेत मॅकच्या ओळखी सोबत अनेक प्रश्न चर्चिले जाणार होते.

  आजकाल आपण सर्वजण आजूबाजूला ट्रेकिंग अथवा गिर्यारोहण क्षेत्रात वाढत जाणारा तरुणाईचा सहभाग बघत आहोत. सुरुवातीला हे छान काहीतरी घडतंय असं वाटत असतानाच या क्षेत्राला एका बाजाराचे रूप येऊ लागले. हळूहळू ह्याची लागण ज्या ठिकाणी हे ग्रुप जाऊ लागले त्या ठिकाणांना होऊ लागली. काही मर्यादेपर्यंत हे खपवूनही घेता आलं असतं पण बाजार मांडल्यागत गोष्टींच्या पुढचा भीषण प्रकार म्हणजे गिर्यारोहण क्षेत्रात अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले काही लोकं/ग्रुप्स “सुरक्षा” या गिर्यारोहण/ट्रेकिंगच्या सर्वात पहिल्या नियमावरूनच उंच उडी मारून आपले कार्यक्रम/कॅम्प राबवू लागले. एकेका डोंगरी ट्रेक मध्ये आधी पन्नास मग पंच्याहत्तर आणि मग शंभर शंभर लोक नेऊ लागले. सह्याद्री हा हवामानाच्या दृष्टीने हिमालयापेक्षा प्रेमळ असला तरी शेवटी निसर्गाचा भाग असल्याने आपणहून नसत्या चुकांनी ओढवून घेतलेल्या संकटांना माफ करेलच असं नाही. निसर्गात चुकला की धपाटा मिळण्याची खात्री असते. त्यामुळे मानवी चुकांचे रूपांतर आधी निसर्गाची विकृत नासाडी आणि त्यापुढे जाऊन अनेक लहान-मोठे अपघात होण्यात होऊ लागले.

  या क्षेत्रात बाजारू, बेफिकीर वृत्ती बोकाळायला मोबाईलने/समाज माध्यमांनी नकळत फार मोठा हातभार लावला. एखादी अजिबात किंवा फारशी माहीत नसलेली निसर्गरम्य अथवा थरारक जागा अचानक प्रकाशात येणे, याशिवाय कड्यावर झोपलेले, वाकलेले दिसायला सुंदर पण आपणहून दुसऱ्यांना अनावश्यक वेडे धाडस करायला प्रोत्साहन देणारे फोटो/सेल्फी एका मिनिटात जगभरात पोहोचू लागले. याचे परिणाम बधिर करणारे होते. अंधारबन दरी, कळसुबाई शिखर सारखे निसर्गरम्य ठिकाण किंवा लोहगड राजमाचीसारख्या गडांवर पावसाळ्यात सुट्यांच्या दिवशी शब्दशः तीन तीन हजार लोक आल्याने ट्रॅफिक जॅम लागल्याचे व्हिडीओ गेल्या दोन महिन्यात अनेकांनी बघितले असतील. कलावंतीण किंवा हरिहरचा गडाच्या उभ्या पायऱ्यांवरचे मानवी ट्रॅफिक जॅम बघून डोकं सुन्न झालं. वरच्या एका व्यक्तीच्या गेलेला तोल अथवा निसटलेला वीतभर दगड हा साखळी प्रक्रियेगत कल्पनेबाहेरचा मोठा अपघात घडवू शकतो हे ध्यानीमनी देखील नसावं? ….. कुठे जातोय आपण? ढिसाळ कारभारामुळे एखादा अपघात झाला की केवळ ती संस्थाच नव्हे तर तर ती जागा देखील बदनाम होते हे लक्षात घ्यायला नको का?

  मुळात मॅक ही संकल्पना आणि संस्था जन्माला येण्यामागे एकंदरच धाडसी क्रीडा प्रकारांमधील हे असे वाहवत जाणारे वागणे आणि त्यावर लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा २०१४ आणि त्यानंतर २०१८ मध्ये आलेला नवा GR कारणीभूत ठरले. नवा GR देखील अनेक अटींबाबत अवास्तव, काही ठिकाणी अनावश्यक तर काही बाबतीत अपुरा आहे. हवाई क्रीडाप्रकार, पाण्यातील क्रीडाप्रकार आणि डोंगर दऱ्यातील गिर्यारोहणागत क्रीडाप्रकार एकाच माळेत ओवून सरधोपट तयार केलेली नियमावली ही अधिक नुकसानकारक ठरू शकते हे लक्षात घेऊन यावर उपाय म्हणून साहसी क्रीडाप्रकारातील व्यक्ती, संस्था एकत्र आणून तिन्ही क्रीडाप्रकारातील तज्ञ व्यक्तींना एकत्र आणून सरकारशी एकमुखाने एकवाक्यतेने संवाद साधण्यासाठी मॅकची स्थापना केली आहे.

  यामुळे सर्व साहसी क्रीडाप्रकारात एक शिस्त येईल, सरकारच्या मदतीने नवीन नियमावली बनल्यास एक शासकीय आणि कायदेशीर अधिष्ठान प्राप्त होऊन घडणारे चुकीचे प्रकार थांबवता येतील अशी मॅकची धारणा आहे. म्हणूनच अधिकाधिक व्यक्ती आणि संस्थांनी मॅकचे सदस्य व्हावे असे आवाहन करण्यात आले. मॅकच्या या सभेला फार चांगला प्रतिसाद मिळाला, या क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळी सभेला उपस्थित होती. त्यांनी काही अनुभव मांडले, काही प्रश्न विचारले, काही महत्वाचे सल्ले दिले.

  खूप वर्षांनी साहसी क्रीडाप्रकाराच्या क्षेत्रात काहीतरी चांगलं घडू पाहतंय हे बघून बरं वाटलं. सर्व साहसप्रेमी एकत्र आले तर सरकारच्या मदतीने आपण महाराष्ट्रात एका नव्या साहस संस्कृतील शिस्तबद्ध आकार देऊ शकतो असे मला वाटते. बघायला गेलं तर आपल्यासमोर सध्या फक्त प्रश्नच आहेत त्यांची उत्तरं एकत्र शोधता आली तर फार बरे होईल.

  (MAC चे सभासदत्व घेण्यासाठी, मॅकबाबत अधिक माहितीसाठी आणि आपली मते, प्रश्न यांसाठी – https://www.mahaadventurecouncil.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.)

  – सौरभ वैशंपायन — with Amit Mengle, Vasant Vasant Limaye, Manisha Panhale, Rajendra Phadke, Rujuta Phadke, Juee Khopkar, Dilip Lagu, Parag Lagu and Amey Ketkar.
  I would like to congratulate all friends who got together, contributed volumes of precious time and raked their brains to conceive “MAC”- MAHA ADVENTURE COUNCIL. (24 July 2019).

  12 Aug, 6pm, Swatantryaveer Swarkar Sabhagriha – MAC’s launch get together in Mumbai.
  It was a highly professional and precise presentation giving an elaborately detailed introduction of MAC.

  It is a much awaited, desperately needed and vital platform which I foresee will garner all entities and establish a path to adhere professionalism, expertise, safety, standards, regulations, monitoring and control ( not restrictions) which in turn will sensitize all towards the importance of these issues in the life of every Outdoorsman.

  I appeal to all my fellow Outdoors guys to ‘jump in’ on the MAC Wagon and proceed on a path towards Excellence and Safe Outdoor Experiences.

  Become a member INSTANTANEOUSLY! A great grab at the cost of maybe a mere Coffee at Starbucka. Man this is unbelievable!

  It’s time to get in the sway n suggest or fire your wildest thoughts which you think will better any aspect in the field.

  We all together, can Bring About a Change and Make A Difference!

  I have already suggested that MAC should also include the various ground support faculties/ facilitators/locals/communities who we have been loyally supporting us out there. All these are a part of our extended family.

  I also appeal to all fellows who go out there to spread the word/ create awareness about Mac an motivate them to join in as a family to herald a fantastic much dreaht about tomorrow in Adveture n Outdoors!

  Kudos MAC once again. — with Vasant Vasant Limaye and Shantanu Pandit.

  Sounding off a bit late due to viral infection (not me but my system!).After over 40 years of a passionate attachment…

  Posted by Bibhas Amonkar on Thursday, August 15, 2019

Viewing 1 post (of 1 total)

You must be logged in to reply to this topic.