G Gogte's 'Maharashtra's Forts Part 1 and 2' book

Home Forums General G Gogte's 'Maharashtra's Forts Part 1 and 2' book

This topic contains 1 reply, has 1 voice, and was last updated by  mumbaihikersadmin 4 months, 2 weeks ago.

Viewing 2 posts - 1 through 2 (of 2 total)
 • Author
  Posts
 • #3627

  महाराष्ट्र देशातील किल्ले भाग – १ व २’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्याआधी याच पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचा इतिहास आणि लेखकाविषयी थोडंस…

  इ.स. १८९६ पर्यंत महाराष्ट्रातील किल्ल्यांविषयीच्या माहितीचे कोणतेही मराठी भाषेतील पुस्तक लिहिले गेले नव्हते.चिंतामणी गंगाधर गोगटे यांनी किल्याच्या माहितीवरील पुस्तक लिहिण्याचे ठरविले. गोगटेंनी गड किल्ल्यांची माहिती संकलित करून व काही किल्ल्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन ‘महाराष्ट्र देशातील किल्ले भाग – १’ हे पुस्तक इ.स. १८९६ साली प्रकाशित केले. पुढे इ.स. १९०५ साली ‘महाराष्ट्र देशातील किल्ले भाग – २’ हे पुस्तक देखील प्रकाशित केले.

  हे दोनही ग्रंथ पुणे शहरातील शुक्रवार पेठेत इंदिरा / इंद्रायणी छापखान्यात प्रकाशित झाले. आज तो छापखाना बंद होऊन ५० पेक्षा जास्त वर्षे होऊन गेली. पुणे येथे शुक्रवार पेठेत हा छापखाना कुठे होता हे देखील आज सांगता येणार नाही.

  आजपर्यंत ज्या ज्या लेखकांनी मराठी भाषेत गड किल्ल्यांच्या माहितीवरील ग्रंथ प्रकाशित केले आहेत त्यामध्ये चिं. ग. गोगटे यांचे नांव सर्वप्रथम येते. त्यामुळे चिंतामण गंगाधर गोगटे यांना आद्य दुर्ग अभ्यासकच म्हणले पाहीजे. गोगटे यांच्या ग्रंथाचा काळ हा इतिहासाचार्य राजवाडे यांचे ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीचा होता. इ.स. १८९६ मध्ये ‘महाराष्ट्र देशांतील किल्ले भाग -१’ हा पहिला ग्रंथ प्रकाशित झाला.

  या ग्रंथाला डेक्कन व्हर्नाक्युलर सोसायटीतर्फे २०० रुपयांचा पुरस्कार मिळाला. पुढे नऊ वर्षांनी पुन्हा गोगटेंनी ‘महाराष्ट्र देशांतील किल्ले भाग – २’ हा ग्रंथ प्रकाशित केला. १९०५ साली झालेल्या या ग्रंथामध्ये रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील किल्ल्यांचा समावेश होता. या ग्रंथाला देखील पुन्हा एकदा डेक्कन व्हर्नाक्युलर सोसायटी ‘Deccan Vernacular Society’ तर्फे २०० रुपयांचा पुरस्कार मिळाला.

  इ.स. १८९६ व १९०५ या दोन वर्षी त्यांना २०० रुपये पुरस्कार म्हणून मिळाले. या कालखंडात सोन्याचा भाव हा १५ ते १८ रुपये तोळा असा होता. अशावेळी २०० रुपयांचा पुरस्कार हा खूप मोठा होता.

  आजपर्यंत भटक्यांना, गिर्यारोहकांना, आणि अभ्यासकांना दुर्मिळ असलेल्या या ‘चिं. गं. गोगटे’ लिखित ‘महाराष्ट्र देशातील किल्ले भाग १ आणि २’ या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशन आज दिनांक ५ मे २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजता प्रसिद्ध लेखक आणि ज्येष्ठ गिर्यारोहक ‘आनंद पाळंदे सर’ यांच्या हस्ते होत आहे तसेच पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर ‘आनंद पाळंदे सर’ यांची मुलाखत देखील होणार आहे.

  स्थळ:-भारत इतिहास संशोधक मंडळ, भरत नाट्य मंदिर शेजारी, सदाशिव पेठ पुणे.

  वेळ:- संध्याकाळी ६ वाजता.

  https://www.facebook.com/श्री-शिवसमर्थ-सेवा-प्रकाशन-Shree-Shivsamarth-Seva-Prakashan-352024838757303/

  #3858

  खास गडप्रेमींच्या आग्रहाखातर “महाराष्ट्र देशांतील किल्ले” या पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणीची मुदत वाढवून ती ३० एप्रिल २०१९ पर्यंत केली आहे. प्रकाशनपूर्व सवलतीचे शेवटचे २ दिवस उरले आहेत. नक्की लाभ घ्या…!!!

  आता गडकिल्ल्यांच्या इतिहासातील आद्य पुस्तक ओळखले जाईल असे “महाराष्ट्र देशांतील किल्ले” लेखक “चिं. गं. गोगटे” यांचे
  भाग १ व २ एकत्रित असलेले पुस्तक ५ मे २०१९ रोजी प्रकाशित होत आहे.

  पुस्तकाविषयीची अधिक माहिती खालीलप्रमाणे
  – एकूण पृष्ठसंख्या २००
  – आकार – क्राऊनसाईज
  – ३२ आर्ट पेपरसह
  – पुस्तकाची मूळ किंमत – ३७५/-
  – प्रकाशनपूर्व सवलत २७५/- + ( कुरियर खर्च ३०/- अधिक )
  – सवलत योजना २५ एप्रिल पर्यंत.
  – खास आकर्षण म्हणजे प्रकाशनपूर्व सवलत योजनेत नोंदणी करणाऱ्यांना १००/- रु. किमतीची “पर्णालपर्वत ग्रहणाख्यान” ची नवी आवृत्ती मोफत…!!!

  मग वाट कसली पाहताय…!!! हा दुर्मिळ ग्रंथ पुन्हा दुर्मिळ होण्यापूर्वी आजच तुमच्या प्रतीची नोंदणी करा आणि या योजनेचा लाभ घ्या…!!!

  तुमच्या सोयीसाठी प्रकाशन पुर्व नोंदणी सुरु असलेल्या स्थळांची नावे देत आहोत…

  १) नासिक येथे ‘ग्रँड बूक बझार’.. सार्वजनिक वाचनालयाच्या पाठीमागे, शालिमार..
  २) ग्रंथभवन, अशोक स्तंभ, नासिक.
  ३) अक्षरधारा, पुणे
  ४) रसिक साहित्य, पुणे
  ५) सह्यांद्री बुक्स, पुणे
  ६) बुकगंगा, पुणे
  ७) मजेस्टिक बुक हाउस, डोंबिवली
  ८) मिहिर उद्योग केंद्र, भूषण बापट ९८५०३८६४९४
  9) निखील गोरे, वाशिम
  १०) उदय एजेन्सी, अहमदनगर
  ११) अंकुर काळे ९६८९८३३५०० / ९३७३१११३८८
  For the purpose of special pioneers, the pre-release period of the book “Forts of Maharashtra Countries” has been extended till April 30, 2019. The last 2 days of preemptive exemptions remain. Take advantage … !!!

  The book ”
  Part 1 and 2 ” is published on May 5, 2019, by author “Chinten Gogate”, “Fort of Maharashtra Countries”, which will now be known as the first book in the history of fortresses .

  More information about the book is as follows
  – Total page number 200
  – Size – Crownsize
  – 32 Art paper
  – Original book price – 375 / – – Pre-release
  discount 275 / – + (Courier cost 30 / – more)
  – Concession plans till 25th April.
  – The special attraction is to get Rs. 100 / – for the pre-release exemption scheme. The new version of the “System Analysis” free of cost … !!!

  Then how do we see … !!! Before this rare book becomes scarce, register your copy today and take advantage of this scheme … !!!

  Giving you the names of the places where the publication has been started for your convenience …

  1) ‘Grand Book Bazaar’ at Nasik. Shalimar, behind the public library.
  2) Librarian, Ashoka Pillar, Nashik.
  3) Akshardhara, Pune
  4) Rasik Sahitya, Pune
  5) Sahyandri Books, Pune
  6) Bookganga, Pune
  7) Majestic Book House, Dombivali
  8) Mihir Udyog Kendra, Bhushan Bapat 9 8503864 9 49
  ) Nikhil Gore, Washim
  10) Uday Agencies, Ahmednagar
  11) Ankur Kale 9 68 9 833500/9 373111388

  खास गडप्रेमींच्या आग्रहाखातर "महाराष्ट्र देशांतील किल्ले" या पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणीची मुदत वाढवून ती ३० एप्रिल…

  Posted by श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशन – Shree Shivsamarth Seva Prakashan on Monday, April 29, 2019

Viewing 2 posts - 1 through 2 (of 2 total)

You must be logged in to reply to this topic.