Dongaryatra डोंगरयात्रा trekking tips (marathi)

Home Forums General Dongaryatra डोंगरयात्रा trekking tips (marathi)

This topic contains 0 replies, has 1 voice, and was last updated by  mumbaihikersadmin 4 months, 2 weeks ago.

Viewing 1 post (of 1 total)
 • Author
  Posts
 • #3699

  पावसाळा सुरू होतोय त्यामुळे घरातून ट्रेकला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची माहिती घ्यावी आणि सुज्ञ भटके असल्याची पोच पावती आपल्या घरातल्यांनाही द्यावी ह्याविषयी थोडसं.

  .

  १) कोणा सोबत(संस्था) जाताय ट्रेकला याची संपूर्ण माहिती आणि संपर्क क्रमांक घरच्यांना न विसरता द्या.
  .

  २) पावसाळ्यात कुणीही उठतो आणि ट्रेक आयोजक होतो अगदी चार दोन किल्ले फिरलेलं पोरं सुद्धा सुरक्षितता फाट्यावर मारून ट्रेकला ग्रुप घेऊन येते त्यामुळे आपण कोणत्या संस्थेच्या माध्यमातून ट्रेकला जाताय त्यांचा अनुभव आणि आयोजकांनी थोडीफार माहिती काढून त्यांच्या सोबत जायचे की नाही याचा निर्णय घ्या.
  .

  ३) ट्रेक आयोजकांनी सोबत घ्यावयास सांगितलेल्या अत्यावश्यक वस्तू आपल्या बॅगमध्ये न विसरता घ्यायला विसरू नका. उदाहरणच द्यायचे झाले तर माझ्या अनुभवानुसार लोकं टॉर्च आणि ORS अनेकदा सांगून सुद्धा कधीच सोबत आणत नाहीत
  .

  ४) ज्या गडावर वा परिसरात ट्रेकला जाताय तिथली थोडी माहिती जाणून घ्या. आता Youtubeवर ढिगाणं व्हिडीओ मिळतात. ह्याने काय होईल तर साधारण ट्रेकचा अंदाज येईल.
  .

  ५) पावसाळ्यात ट्रेकला जाताना आपल्या सोबत आपल्याला काही रोजची औषध असतील तर ती जरूर सोबत घ्यावी.
  .

  ६) ट्रेक आयोजकांच्या तसेच ट्रेक लिडरच्या ट्रेकच्या दरम्यान सूचना असतील त्या सर्वांनी पाळायच्या असतात कारण त्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी असतात.
  .

  ७) पावसाळ्यात घरी रडून रडून घेतलेले महागडे कॅमेरा ट्रेकला हवा करायला आणायचे नाहीत कारण ते भिजून खराब होऊ शकतात.
  .

  ८) पावसाळ्यात धबधबे आणि नद्या यांचा नाद करू नये कारण जीवावर बेतू शकते.
  .

  ९) पावसाळ्यात चांगल्या प्रतिचे आणि स्वतःच्या पायाच्या मापाचेच शूज गरजेचे असतात. सँडल आणि लेदर शूज ह्यांच्या जिवावर वराती गाजवायच्या असतात ट्रेकचा आणि ह्यांचा संबंध पावसाळ्यात तर नसतोच नसतो.
  .

  १०) ट्रेकला आपल्या सोबत इतर ही लोकं ट्रेकला आलेली असतात त्यात मुली, महिला आणि लहान मुलं सुद्धा असतात त्या कुणालाही आपला त्रास होईल अशी आपली वर्तणूक नसावी.
  .

  ११) गडांवर कचरा करू नये आणि कुणाला करू देऊ नये. इथं पोहून कोणतेही पदक वा मेडल मिळत नाही त्यासाठी जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले कसब पणाला लावावे. गडांवर असलेले पाणवठे अनेक संस्था अक्षरशः आपले रक्त आठवून त्या टाक्यांची वेळोवेळी साफसफाई करत असतात.
  .

  १२) निसर्गाचे काही लिखित – अलिखित नियम आहेत ते आपण कायम पाळत आले पाहिजे त्यांचा आदर करायला पाहिजे.

  .https://www.facebook.com/927369180764690/photos/a.931394700362138/1232269393607999/

Viewing 1 post (of 1 total)

You must be logged in to reply to this topic.