नाशिक जिल्हा ट्रेकर्स मंडळी

Home Forums General Maha Adventure Council MAC नाशिक जिल्हा ट्रेकर्स मंडळी

This topic contains 1 reply, has 1 voice, and was last updated by नाशिक जिल्हा ट्रेकर्स मंडळी 1 mumbaihikersadmin 3 weeks, 5 days ago.

Viewing 2 posts - 1 through 2 (of 2 total)
 • Author
  Posts
 • #11974

  ट्रेकर मंडळी
  नमस्कार,
  नाशिक जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ट्रेकिंग करणारे
  लहान मोठे ग्रुप आहेत.कुणी बारमाही फिरतात कुणी ऋतुमानानुसार.तर आपली एक संघटना तयार होतं आहे.ती का करायची..? उद्देश काय..? याबाबत मागे फेसबुक वाॅलवर पोस्ट टाकली होती.त्याला अनुसरून नाशिक जिल्ह्यातील तमाम ट्रेकिंग ग्रुप लिडर्सना विनंती करण्यात येते आहे की, तुम्ही आपल्या ग्रुपचे व दोन क्रियाशील सदस्यांचे नांव,मोबाईल नंबर सह ९९६०० १०००९ या नंबरवर पाठवावे.पुढील कार्यक्रमाबाबत कधी भेटायचं हे आपणास लवकरचं कळविण्यात येईल.
  धन्यवाद

  आपला
  टिम नाशिक जिल्हा ट्रेकर्स

  ट्रेकर मंडळीनमस्कार,नाशिक जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ट्रेकिंग करणारेलहान मोठे ग्रुप आहेत.कुणी बारमाही फिरतात कुणी…

  Posted by Sanjay Amrutkar on Wednesday, August 21, 2019

  #11975

  ए भाय, जरा देखके चलो!

  गेले दोन महिने मी MAC च्या कामात खूप व्यग्र होतो. तशातही कानावर येणाऱ्या काही घटना अस्वस्थ करणाऱ्या होत्या. इतक्या की कुठल्याश्या गडावरील तोबा गर्दी, खळाळत वाहणाऱ्या भयानक प्रवाहात वाहून जाणारा कुणीतरी अशी भीषण स्वप्नंही कधीमधी दिसू लागली. महिन्याभरापूर्वी राजमाची किल्ल्यावर साडेतीन हजार पर्यटक/ट्रेकर्स वस्तीला होते, कळसूबाईवर लागलेल्या रांगा, लोहगडावरील झुंबड आणि हरिहर किल्ल्यावर हजार बाराशे लोकांनी केलेली भाऊगर्दी असं काय काय तरी! एकीकडे हे सारं वाचून, WhatsApp वरील फोटो पाहून, अश्या ठिकाणी काही विपरीत घडलं तर – या कल्पनेनं अंगावर काटा येत होता. दुसरीकडे ‘हे सारं घडलं कसं?’ हा विचार छळत होता.

  अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी डोंगरवाटांनी मला वेड लावलं. त्या मनमुराद भटकंतीत एक निखळ आनंद होता. ‘चल रे’ म्हणून मीही कि,तीतरी जणांना या न मळलेल्या वाटांवर घेऊन गेलो. रॉक क्लायंबिंग, गिर्यारोहण यातील प्रशिक्षण घेतल्यावर विविध मोहिमा सुरु झाल्या. शाळेतील लहान मुलांना साहस शिबिरांची गोडी लावण्यात एक धन्यता होती. यातूनच पुढे स्कॉटलंडमध्ये प्रशिक्षण घेण्याचा योग आला. अनेकांना गिरिभ्रमणातील धडे देण्यात विशेष आनंद मिळत असे. या साऱ्या झपाटलेल्या प्रवासात साहसी क्रीडाप्रकारातील धोकेही स्पष्टपणे जाणवू लागले आणि सुरक्षिततेचं भान टोकदार होऊ लागलं. Adventure Tourism या क्षेत्राची ओळख झाली. परदेशी गिरीप्रेमींना हिमालयात नेणे अश्या व्यवसायात संधी मिळाली. त्यातच साहस आणि निसर्ग यांच्या माध्यमातून Management Training करता येतं या अभिनव पध्दतीचा श्रीगणेशा भारतात करण्याचं भाग्य लाभलं. या साऱ्या गोष्टी करतांना सुरक्षिततेचं भान कधी सुटलं नाही. लौकिक अर्थानं वांझोट्या भटकंतीकडे व्यावसायिक सन्मान्य पेशा म्हणून पाहण्यात येऊ लागणं, हे स्थित्यंतर माझ्या डोळ्यासमोर घडलं किंबहुना यात सहभाग घेता आला हे मी माझं भाग्य समजतो. पण याचबरोबर गेल्या वीस वर्षांत सभोवतालच्या परिस्थितीत झपाट्यानं बदल घडत होता!

  इंटरनेटमुळे माहितीचा विस्फोट, वाढलेली क्रयशक्ती, सेल्फी संस्कृती आणि चंगळवादी बाजारीकरण हे साहसी क्रीडाक्षेत्रात अलगदपणे कधी शिरलं ते लक्षातच नाही आलं! एकीकडे गिरीभ्रमण, निसर्गप्रेम लोकप्रिय होतंय याचा आनंद होता तर दुसरीकडे याच क्षेत्रात शिरणाऱ्या अनिष्ट प्रथा चिंताजनक होत्या. या साऱ्याला आपण कारणीभूत तर नाही असा वेडगळ विचार कधीकधी मनाला कुरतडतो. पण नाही! या क्षेत्रातील पूर्वसूरींकडून, जाणत्या ज्येष्ठांकडून जे मिळालं ते देण्याचाच शक्य तितका प्रयत्न मी केला आहे. आणि यामुळेच आज हे सारं पाहतांना मी अस्वस्थ होतो! MAC चा प्रयत्न अनेकजणांच्या याच तळमळीतून उभा राहतो आहे. मग दोन GR आले, त्यांच्या अव्यवहार्यतेला विरोध होता. या सर्व गोष्टींचे नियमन व्हायला हवे आणि त्यासाठी प्रयत्न करणे, शासनाला सहाय्य करणे हीच भूमिका होती आणि आहे! हे सारं करत असतांना एक कल्पना सुचली!

  नगररचना आणि नियोजन या क्षेत्रात काम करणाऱ्या, लेखन करणाऱ्या सुलक्षणा महाजन या मैत्रिणीची आठवण झाली. जयंत धारप या आर्किटेक्ट मित्राचाही सल्ला घ्यावा असं मनात आलं. बेसुमार गर्दी होणाऱ्या ठिकाणी ‘बंदी घालणे’ हा यावरील उपाय असूच शकत नाही, दुर्दैवाने शासन सध्या गोंधळात पडून काही ठिकाणी याचा अवलंब करतांना दिसते आहे. सुजाणपणे या प्रश्नांची उकल करायची असल्यास नियमन अत्यावश्यक आहे परंतु याचा अभ्यास करणं तितकंच महत्त्वाचं आहे.

  निसर्गप्रेमी, गिरीप्रेमी मंडळींना आवडणारी ठिकाणं दुर्गम जागी असतात, वाटा अवघड असतात. वरील जागा देखील अनगड आणि मर्यादित असते. नगररचना/ विकास या शास्त्रात एखाद्या शहरात Recreational Space/Parks साठी किती जागा, तसेच एखादा मार्ग (Access) त्याचा कितीजण वापर करणार (Traffic) अशा गोष्टींसाठी मानके (Standards) असतात. यात निकोप सुरक्षित वापर लक्षात घेऊन क्षेत्र वा रुंदी ठरविण्यासाठी नियम असतात. यातील तर्क आपण जरा उलट्या पध्दतीने वापरून पाहू! म्हणजेच क्षेत्र ठाऊक आहे तर त्याचा निकोपरित्या कितीजण वापर करू शकतील, अथवा मार्गाची जागा, चढ आणि रुंदी लक्षात घेता त्याचा मर्यादित वेळात कितीजणांनी वापर करावा अशा गोष्टी शास्त्रोक्त पध्दतीने ठरविता येऊ शकतील. थोडक्यात एखादा किल्ला आणि त्याचे क्षेत्रफळ लक्षात घेता त्यावर एका दिवसात कितीजणांनी जावे, किंवा अरुंद चढाचा मार्ग असेल तर मर्यादित वेळात कितीजणांनी त्याचा वापर करावा हे ठरविता येऊ शकेल. म्हणजेच हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी नियमन करायचे असल्यास त्याला शास्त्रीय आधार असू शकतो. यालाच Carrying Capacity म्हणून ओळखतात. हे सारं फार बाळबोध किंवा सोप्पं वाटेल पण या दिशेने सविस्तर अभ्यास निश्चित करता येईल! अभ्यासपूर्वक, सुजाणपणे नियमन करायचे असल्यास असे मार्ग खचितच सापडू शकतील! मला वाटते MAC हे काम करू शकेल, नव्हे ही MAC च्या कामाची भविष्यातील दिशा असेल. पण यासाठी तज्ञ, अनुभव, वेळ आणि आर्थिक पाठबळ लागणार आहे. यासाठीच साहसी क्रीडाक्षेत्रातील सर्वांनीच एकत्र येणे गरजेचे आहे तरच ही चळवळ अर्थपूर्ण होऊ शकेल! आमेन

  – वसंत वसंत लिमये

  ए भाय, जरा देखके चलो!गेले दोन महिने मी MAC च्या कामात खूप व्यग्र होतो. तशातही कानावर येणाऱ्या काही घटना अस्वस्थ…

  Posted by Vasant Vasant Limaye on Monday, August 12, 2019

Viewing 2 posts - 1 through 2 (of 2 total)

You must be logged in to reply to this topic.