Loading Events

« All Events

  • This event has passed.

कोल्हापूर हायकर्स एक सांज पन्हाळगडवर २५ -१०- २०१९

October 25 @ 8:00 am - 5:00 pm UTC+5.5

Panhala Fort

🚩कोल्हापूर हायकर्स 🚩
आयोजित
✨”एक सांज पन्हाळगडवर”✨
इतिहास उजळवणारा अनोखा दीपोत्सव !!【वर्ष ७】

आज प्रत्येकाने आपापल्या घरी दिवाळी उत्साहात कशी साजरी करायची याचे नवनवीन संकल्प करून त्याप्रमाणे तयारीला सुरुवात ही केली आहे.
पण आपल्या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे घर म्हणजे गडकिल्ले यांच्याविषयी काय???
ज्या गड-किल्ल्यांमुळे आज आपण घराघरात दिवाळी साजरी करतोय तेच गड – किल्ले ऐन सण-उत्सवांच्या काळात अंधारात असतात.
एकांतात असलेल्या ह्या ऐतिहासिक वारसदारांना कधी पाहायला मिळणार दिवाळी ..???
कधी अनुभवणार ते गडकोट देखील दिवाळीची सांज……???
आणि म्हणूनच कोल्हापूर हायकर्स परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुन्हा एकदा साजरी करूया “एक सांज पन्हाळगडवर” स्वराज्याच्या गडकोटांवर

✨”एक सांज पन्हाळगडवर”✨
धनत्रयोदशी ची संध्याकाळ..

वर्षभर अपरिचित गड किल्ल्यावर ट्रेकिंग आयोजित करणाऱ्या तरुणांचा ग्रुप म्हणून कोल्हापूर हायकर्स या ग्रुपची ओळख. बदलत्या काळात इतिहासाचे भान सुटू नये आणि किल्ल्यांचे महत्व प्रत्येक तरुणापर्यंत पोहचावे यासाठी कोल्हापूर हायकर्स सतत प्रयत्नशील असते. प्रत्येक वर्षी वेगळ्या पद्धतीने अनेक उपक्रम साजरे करण्यात कोल्हापूर हायकर्स नेहमीच पुढे असतात.
आपण आपली दिवाळी कायम घरातच साजरी करत असतो, पण ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला त्याच महाराजांनी घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात.
नेमक हेच हेरून कोल्हापूर हायकर्स तर्फे गेल्या ​६ वर्षापासुन पन्हाळा गडावर धनत्रयोदशीच्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या उपस्थितीत शिव मंदिराचे पूजन करून या दीपोत्सवाची सुरुवात होत आहे. या उपक्रमासाठी सर्वांना मोफत सहभागी होता येणार आहे. शिवप्रेमीं येताना स्व: इच्छेने मेणाच्या पणतीचे एक पाकीट घेऊन येऊ शकतात. या उपक्रमासाठी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींनी आपल्या परीवारासोबत सहभागी होऊन दीपोत्सवाचा आनंद घ्यावा हीच नम्र विनंती
आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

===========÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷===========
🔸कार्यक्रमाचे स्वरूप …..
🔅दिनांक : २५ -१०- २०१९
🔅सायं ६.०० वाजेपर्यंत आपल्या परिवारातील सर्व शिवप्रेमींनी पन्हाळगडावर शिवमंदिर येथे एकत्रित यावे
🔅सायं ६.१५ वाजता शिवप्रेमींची ओळख करून देणे.
🔅सायं ७.०० वाजता खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते शिव मंदिराचे पूजन करून दीपोत्सवाची सुरुवात.
🔅त्यानंतर ७.३० ते ८.३० वाजता दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांचे “शिवरायांचे आठवावे रूप” या विषयावर व्याख्यान
🔅रात्री ८.३० ते ९.३० वाजता श्रीमंतयोगी मर्दानी आखाडा,बागल चौक यांची शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके
🔅पन्हाळागडावर दीपप्रज्वलन ९. ३० वाजल्यापासून रात्री ११.०० वाजेपर्यंत असेल
या दीपोत्सवास खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले, दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके, पन्हाळा नगरअध्यक्षा रुपाली घडेल, पन्हाळा पोलीस निरीक्षक ए. डी फडतरे, पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदचे मुख्य अधिकारी कैलास चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
===========÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷===========

🔸(शिवप्रेमींना विनंती की कोणीही फटाके सोबत आणू नये. पर्यावरणाचे रक्षण ही आपली जबाबदारी आहे आणि त्याची जाणीव आपणा सर्वांना असणे महत्वाचे आहे.)

पुन्हा एकदा साजरी करूया “एक सांज पन्हाळगडवर” स्वराज्याच्या गडकोटांवर
तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल या सोहळ्यात तर लगेच खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.👇🏻 https://chat.whatsapp.com/JyyBGsqpX8K5YjZE5ErL6I

📞अधिक माहितीसाठी संपर्क :-
८२३७०७९९९९ / ९५७९९९७१११

अध्यक्ष,
सागर पाटील,
🚩कोल्हापूर हायकर्स🚩
www.kolhapurhikers.com

#historicalcostume #thcentury #costume #thcenturyfashion #costumedesign #s #historicalfashion #history #perioddrama #historicalsewing #reenactment #perioddramas #historicalcostuming #historicalclothing #costumedesigner #travelogue #travelgram #traveltales #travelblog #travelblogger #fashion #louisianamarieantoinette #creolestyle #travelholic #traveltheworld #pontalbaapartments #lgbttravel #thcenturylouisiana #thebaronesspontalba #bhfyp

Kolhapur Hikers🚩
Organized
✨ “One eveningatPanhalagad “✨ Unique Deepotsav whichunveils
history !! 2 years 29

Today, everyone has started a new concept of how to celebrate Diwali with enthusiasm in his home.
But what about Gadkile, the home of the Shivaji Hindavi Swarajya?
The fortresses that we celebrate Diwali in the house today are in the dark during the fortresses and festivals.
When will Diwali get to see these historic heirs in solitude .. ???
When will you experience Gadkot Diwali even …… ???
And that’s why this unique event is organized every year by the Kolhapur Hikers family as well.
Let us celebrate once again on “One evening Panhalagad” on the fort of Swarajya

✨ “One evening at Panhalgad”✨
Dhanatrayoshi evening ..

Kolhapur Hikers is known as a group of youths who are conducting trekking at unfamiliar fortress all year long. Kolhapur hikers are constantly striving to ensure that the history of the fort is not abandoned in the changing times and that the importance of the fort is reached to every youth. Kolhapur hikers are always looking forward to celebrating different activities every year.
We always celebrate our Diwali at home, but many of the forts built by Maharaj, which were built by Shivaji Maharaj and established the Swarajya, are still in the dark during Diwali.
Kolhapur hikers have celebrated Deepotsav on the day of Dhanatrodashi on Panhala fort for the last 3 years. This year, the festival is being started by worshiping the Shiva temple in the presence of Kolhapur MP Chhatrapati Sambhaji Raje Bhosale this year. All are free to participate in this program. Shiva lovers can voluntarily come with a wallet for wax wax. It is a humbling request for thousands of Shiva lovers to join their family and enjoy the Deepotsav for this
event.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ =========== ===========
🔸 Event Format …..
🔅 Date: 25 10 201 9
🔅 By 5 pm, all Shiv
lovers in your family should come together at Shiv Temple on Panhalgad to introduce Shiv lovers at 5 pm.
🔅 7.00 MP at Chhatrapati Sambhaji Raje Bhosle began dipotsavaci the vaults of the temple at the hands of Lord Shiva.
🔅 then rock scholar Dr 7.30 to 8.30 pm. Amar two times of “Shivaji remember as” the subject of a lecture
🔅 night srimantayogi masculine arena 8:30 am to 9 pm 30, Bagal of Shivaji Chowk masculine sport demonstrations
🔅 panhalagada the lamp 9. It will be from 5 pm to 5 pm
Chhatrapati Sambhaji Raje Bhosale, Durg Practitioner Dr. Amar Adeke, Panhala city chief Rupali will happen, Panhala police inspector A. De Phadater, Panhala Giristhan Municipal Council Chief Officer Kailash Chavan will be the chief attendant.
=========== ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ ===========

2 (Request to Shivapremias that no one should come with firecrackers. It is our responsibility to protect the environment and it is important for all of us to be aware of it.)

Details

Date:
October 25
Time:
8:00 am - 5:00 pm
Event Category:
Event Tags:
,

Organizer

Kolhapur Hikers
Phone:
8237079999
Website:
https://www.kolhapurhikers.com/

Venue

Panhala fort
Panhala Fort,Panhala,Maharashtra416201India+ Google Map